मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली.
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या ६२६ उमेदवारांच्या मुलाखती यशदा, पुणे येथे दिनांक १० ते १३ एप्रिल २०२३ या चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधित सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. सदर परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ व गट-ब संवर्गातील नियुक्तीसाठी २०३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील असे आयोगाने कळविले आहे.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८