मुबई प्रतिनिधी : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील होमगार्ड जवान हरिबा शेनफड फरकाडे हे सिल्लोड पथकामध्ये गेल्या 24 वर्षापासून कार्यरत होते. ऑक्टोबर 2022 मध्ये नवरात्र उत्सव बंदोबस्तात कर्तव्यावर असताना त्यांचे अपघाती निधन झाले. राज्य शासनाने होमगार्डना विमा संरक्षण प्राप्त व्हावे यासाठी 46 हजार होमगार्ड यांचे बँकेत बचत खाते उघडून सर्वांना विमा संरक्षण व अन्य सुविधा मिळवून दिल्या आहेत.
अपघाती विम्यापोटी बँकेने 50 लाख रुपयांचा धनादेश नुकताच मुंबईत त्यांच्या वारसदारास पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्यासह कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी विजय पवार व एच.डी.एफ.सी. बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८