२६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणा उभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता

मुबई प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system) ची सर्व २६ नदी खोऱ्यात उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

  या बैठकीत कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३६ विषयांबाबत चर्चा होऊन मान्यतेचे निर्णय घेण्यात आले. गडनदी गडगडी तिलारी प्रकल्पांच्या भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांना अनुदान, पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली. पाली-भूतावली कोर्लेसातंडी तिडे बेर्डेवाडी इत्यादी प्रकल्पाच्या कामांवरील वाढीव आर्थिक दायित्व सुमारे ९० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८