प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

वी दिल्ली प्रतिनिधी : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठीची मुदतवाढ 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  प्रदान केला जातो. यासाठी अर्ज पाठविण्याची तारीख ही 31 जुलै 2023 पर्यंतची होती, ती आता  वाढवून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (पीएमआरबीपी) 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती https://awards.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  असामान्य धाडस क्रीडा समाजसेवा विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण कला आणि संस्कृती तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे.

  भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुल मुली  ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक नाही असे या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात. अथवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुला - मुलींचे नामांकन करू शकते.या पुरस्कारांसाठीचे अर्ज विहित केलेल्या https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येतील.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८