वसतिगृहातील मुलींचे पालक म्हणून सर्वांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारावी -उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी : वसतिगृहातील मुलींची प्रत्येकाने पालक म्हणून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहातील अधीक्षकांसाठी  राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि प्रेरणादायी कार्यशाळा आज सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ.रश्मी करंदीकर सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सर्व शासकीय वसतिगृहातील अधीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.

  शासकीय वसतिगृहातील अधिक्षकांनी आपले वसतिगृह सुरक्षित आणि सुंदर असण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवावा.वसतिगृहातील मुलींचे  आपण पालक म्हणून जबाबदारी स्वीकारावी आणि या कार्यशाळेतून प्रशिक्षण आणि प्रेरणादायी विचार घेऊन आपल्या वसतिगृहामध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून कार्य करावे अशा सूचना देऊन राज्यातील वसतिगृहांचा आढावा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पाटील यांनी घेतला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८