केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते.केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे मानद सचिव सुधीर साळवी खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.

  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार आशीष शेलार माजी मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे दर्शन

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शन घेत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार पूनम महाजन आमदार ॲड.आशिष शेलार मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८