मुंबई प्रतिनिधी : भूदल नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाची (SSB) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी या परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण नाशिक येथे मोफत देण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील उमेदवारांनी २५ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुंबईचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सैन्यदलातील अधिकारी पदासाठीच्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी उमेदवारांना प्रशिक्षण, निवास व भोजन नि:शुल्क देण्यात येते. नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी मुंबईतील उमेदवारांची निवड चाचणी मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुंबईतील उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरील एसएसबी - ५४ कोर्स संदर्भातील अर्ज सादर करावे, किंवा व्हॉट्स ॲप 9156073306 या क्रमांकावर एसएसबी-54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट सादर करावी.
केंद्रामध्ये एस. एस. बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढे नमूद केलेली कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेवून येणे आवश्यक असणार आहे.अ) उमेदवार हा कम्बाईड डिफेन्स सव्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण असावा. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा.
ब) एनसीसी 'सी' सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.क) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.ड) विद्यापीठ प्रवेश योजनेसाठी (University Entry Scheme) एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड यांचा ई-मेल आय डी : training.petenashik@gmail.com अथवा दूरध्वनी क्र. 0253-2451032 अथवा भ्रमणध्वनी क्र. 9156073306 यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहरयांनी केले आहे. यांनी केले आहे.