पोलीस आणि ड्रायव्हर यांचे नाते असे असवे की...

पोलीस आणि ड्रायव्हर यांचे नाते म्हणजे आसे आहे की   "जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती"

त्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : पोलीस हा पोलीस स्टेशनला कर्तव्यावर असो की वाहतूक विभागात कर्तव्यावर असो पोलीस आणि ड्रायव्हर यांचे समोरा-समोर येणे हे अटळ सेच आहे. त्यामुळे भले ही १७ सप्टेंबरला हायवे पोलीसांनी चालकांचा सन्मान करावा असा शासन आदेश जरी सला तरी ज्या‌ पोलीसांमुळे आपल्या चालक भावांना‌ आपघाती तात्काळ मदत होते व त्यांच्या मुळे माझ्या चालक भावांना जिवदान मीळते.त्या पोलीसांचे  आसणारे माझ्या चालक भावांवरील ऋण हे आपण इतर कशाने तर नाही फेडू शकत.म्हणून एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी १७ सप्टेंबर हा वाहनचालक दिवस म्हणून निवड करण्यात आली आणि माझ्यासह संघर्ष ग्रुप मधील सर्व सदस्य आणि पदाधिकारीना विनंती वजा आदेश दिला की भले ही फूल देऊ नका.परंतु फुलाची पाकळी देऊन तरी पोलीस बांधव व पोलीस भगिनींचा जमेल त्या फाटक्या तुटक्या शब्दात आभार व्यक्त करा.

  आज मला‌ आनंद होत आहे की आमच्या कारकिर्दीतील सात वर्षा पैकी दोन वर्ष कोरोना मध्ये गेले.राहिलेले पाच वर्ष संघठन वाढि सोबतच आमच्यातीलच काहि कळीच्या नारदां सोबत तसेच गद्दारांना तोंड देण्यात गेले.तरी पण १७ सप्टेंबर २०२३ ला‌ अर्ध्या अधीक महाराष्ट्रात जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्था प्रणित जय संघर्ष संघटनेच्या वतीने चालक दिवस साजरा करण्यात आला. 

  ज्या शहरा मध्ये चालक दिवस साजरा करण्यात आला.त्या सर्वांचे आभार धन्यवाद आणि जे काहिच करू शकले नाही. त्यांना संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोरची विनंती आहे की पुढिल वर्षी न चुकता चालक दिवस साजरा करण्यात यावा व त्या मधे मुखत्वे पोलीस प्रशासनाचे आभार मानावेत. कारण जेव्हां आपघात घडतो तेव्हां तुमचे प्राण वाचवण्यासाठी तुमच्या रक्ता मासातील नात्याचा तुमच्यासाठी धडपडणारा  असा जवळचा कोणीच नसतो.जो आसतो‌ तो फक्त पोलीस आसतो.करीता पुढिल वर्षी प्रत्येक वाहनचालक संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील पोलीसांचा आदर सत्कार हा‌ व्हायलाच पाहिजे. 

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८