ज्ञानेश्वरी लिहिली त्या परिसराची स्वच्छता करा ?

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे..

मुंबई प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी  ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली त्या परिसरातील दुरावस्था झाली असून आपण लवकरात लवकर स्वच्छता करावी किंवा आमच्या संस्थेला स्वच्छतेसाठी परवानगी द्यावी. आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज लिखित ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती आहे. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी  संपूर्ण विश्वाला  सत्य ज्ञानरूपी  ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहुन विश्वतेज दिले.जगाच्या कल्याणासाठी पसायदान लिहीले ती महाराष्ट्र राज्यातील नगर जिल्ह्य़ातील  नेवासा ही भुमी पवित्र आणि पावन झाली आहे.

  परंतु अत्यंत वाईट वाटते नेवासातील ज्या मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या खांबाला पाठ टेकवत ज्ञानेश्वरी लिहीली त्या मंदिराचा परिसर अत्यंत घाण आणि जंगली झाडाझुडपाने वेढला गेला आहे.या मंदिरा लगतच्या झाडाझुडपात शौच देखील करत असतात. अत्यंत किळसवाणी आणि चिड आणणारा हा भयानक प्रकार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी विनंती सुधीर मुनगंटीवार हे या पवित्र स्थळाला न्याय देतील ? 

  तेथील जिल्हाधिकारी व मंदिर ट्रस्टी यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहेत ? वारकरी संप्रदायातील देखील कुणीही पुढाकार घेण्यास तयार नसल्यामुळे या संस्थेने मुख्यमंत्री आणि संस्कृती मंत्र्यांना मिशन जनकल्याण या संस्थेतर्फे स्वच्छता व पावित्र्य राखण्यासाठी निवेदन देण्यात आले.आपण स्वच्छता करण्यासाठी एक पाऊल पुढे यावे. मंदिर परिसरातील स्वच्छता व स्थळाची पवित्रता राखण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून रितसर परवानगी मिळावी जेणेकरून आम्ही आमच्या संस्थेमार्फत या पवित्र ठिकाणची स्वच्छता करू देऊ.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८