छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना

मागेल त्याला फळबाग शेततळे योजनेस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव

मुंबई प्रतिनिधी : कृषी विभागामार्फत मागेल त्याला फळबाग ठिबक/ तुषार सिंचन शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे योजनेस छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असे नाव देण्यात येत आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

  २०२३-२ आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग ठिबक/ तुषार सिंचन शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त योजनेस नाव देण्यात आले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८