अनेक शहरांची हवेतील गुणवत्ता खालावली
मुंबई प्रतिनिधी चित्रलेखा रासने : सध्या राज्यात प्रदुषणामुळे हवा गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. दरम्यान यामध्ये केवळ मुंबई पुणे या शहरांचाच नाही तर राज्यातील अनेक शहरांचा समावेश आहे. हे चित्र धक्कादायक असून यामुळे राज्यामध्ये नागरिकांना श्वास अक्षरशःकोंडला आहे. त्यातून अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.गेल्या 24 तासांच्या हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट(माध्यम) श्रेणीमध्ये गेल्याचं अनेक शहरांमध्ये पाहायाला मिळालं आहे. ही आकडेवारी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने यांनी दिली आहे.यामध्ये अनेक शहरात प्रदूषक पीएम 2.5 पीएम 10 च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाली आहे. तर पुण्यात NO2 आणि जालन्यात O3 प्रदुषकांची मात्रा वाढली आहे. उल्हासनगर परिसरात हवा गुणवत्ता वाईट श्रेणीत एक्यूआय 213 वर तर जळगावात एक्यूआय 199 वर आहे.
दरम्यान या परस्थिती मागे काही कारण देखील सांगण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्वेकडून येणारे वारे वाऱ्यांची कमी गती तापमानात होणारी घट आणि डस्ट लिफ्टिंगमुळे हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट (माध्यम) श्रेणीमध्ये गेला आहे. म्हणजे हवा गुणवत्ता बिघडली आहे.त्याचबरोबर प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील कारणीभूत आहे. शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात.त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात.असं देखील सांगण्यात येत आहे.तर या हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट (माध्यम) श्रेणीमध्ये गेला आहे.म्हणजे बिघलेल्या हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनारकडून पावली उचलली जात आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झालीय त्यानंतर मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाल्याचं चित्र दिसत आहे.