मुंबई शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विद्यावेतनासाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज करावेत

मुंबई प्रतिनिधी : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राज्य शासनाची शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जाती विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) इ.योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

 शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ साठीचे अर्ज http://mahadbtmahait.gov.in या महाडिबीटीपोर्टलवर ११ ऑक्टोंबर पासून भरता येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी दिली आहे.

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहरातील शिक्षणक्रमात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती इमाव विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी यांनी अचूक अर्ज भरावेत तसेच सर्व प्राचार्य कर्मचारी यांनीही शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक व तात्काळ सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८