कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी रुपये १८,०००/- बोनस जाहीर !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास रुपये १८,०००/- सानुग्रह अनुदान यावर्षी देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.दीपावलीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यासाठी कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील महापालिका कर्मचारी वर्गास वाढीव बोनस देणेबाबत पत्रान्वये कळविले होते.गतवर्षी महापालिका कर्मचारी वर्गास रुपये १६,५००/- इतका सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.

  यावर्षी वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकारी वर्गासही हे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असून आपण स्वत: मात्र हे सानुग्रह अनुदान घेणार नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.या पत्रकार परिषदेत मुख्य लेखा परिक्षक लक्ष्मण पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव उपस्थित होते.

आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांना देखील प्रथमच रुपये 5,000/- सानुग्रह अनुदान मंजूर !

   कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सध्या कार्यरत असलेल्या ३७० आशा स्वयंसेविका व २ आशा गट प्रवर्तक यांना देखील रुपये ५,०००/- सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज मंजूरी दिली आहे.आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना प्रथमतः सनुग्रह अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८