डंकीच्या प्रदर्शनाआधी शाहरुख मुलगी सुहानासह साईचरणी शिर्डीत चाहत्यांचा जल्लोष

शिर्डी प्रतिनिधी भाग्यश्री रासने : सध्या शाहरूख खानचा आणि त्याची लेक सुहाना खान या दोघांच्या चित्रपटांची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यामध्ये शाहरूखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सुहानाचा नुकताच अर्चिज हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दोन्ही चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख मुलगी सुहानासह साईचरणी लीन झाला.शाहरूख खान आणि सुहाना खान शिर्डीत आल्याने शिर्डीत चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. शाहरूखने साई समाधीचं दर्शन घेतलं.साईंच्या समाधीला वस्त्र अर्पण केलं. आरती देखील शाहरूखच्या हस्ते कऱण्यात आली. संस्थानकडून त्यांचा शाल आणि साईंची मुर्ती देत आदरसत्कार करण्यात आला.

  शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले आहेत.  हा चित्रपट २१ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात विकी कौशल आणि बोमन इराणी देखील दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे.दुसरीकडे शाहरूखची मुलगी सुहानाचा २०२३ मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट द आर्चीज हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात नवीन चेहरे दिसले. विशेष म्हणजे द आर्चीज मधून अनेक स्टार किड्स बी-टाऊनमध्ये डेब्यू करत आहेत.यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान  बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा यांच्या नावाचा समावेश आहे.द आर्चीजच्या इतर स्टार्समध्ये मिहिर आहुजा आदिती सहगल युवराज मेंडा आणि वेदांग रैना यांचा समावेश आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८