मुबंई प्रतिनिधी भाग्यश्री रासने : सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनातील मोस्ट अवेटेड चित्रपट फायटरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. फायटर मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर रिलीजनंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. चाहत्यांची उत्कंठा वाढवत असतानाच निर्मात्यांनी फायटरचा रोमांचक टीझर रिलीज केला आहे. हा टीझर संपूर्ण अॅक्शन सीनने भरलेला आहे.
फाइटचा टीझर रिलीज फायटर या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज करून चाहत्यांना चित्रपटाची पहिली झलक दाखवली आहे. या एरियल अॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या १ मिनिट १३ सेकंदाच्या टीझरमध्ये हृतिक रोशन दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांचा दमदार लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.कमांडिंगच्या गणवेश परिधान केलेले तिन्ही तारे अप्रतिम दिसत आहेत आणि त्यांचे हवाई स्टंट पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत.चित्रपटात दीपिका आणि हृतिक फायटर जेटमध्ये बसून एरियल अॅक्शन करताना दिसत आहेत.
टीझरमध्ये हृतिक-दीपिकाच्या रोमँटिक केमिस्ट्रीची झलक एवढेच नाही तर टीझरमध्ये बॅकग्राऊंडमध्ये राष्ट्रध्वजासह हेलिकॉप्टरमधील हृतिकचा क्लोजिंग शॉटही दमदार आहे. वंदे मातरमचा पार्श्वसंगीत देशभक्तीच्या उत्साहाने भरलेला बघायला मिळत आहे.शिवाय हृतिक-दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्रीही टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. या दोघांचा लिप-लॉकही पाहायला मिळाला जो टीझर रिलीज झाल्यानंतर नक्कीच चर्चेत असणार आहे.
फायटर कधी रिलीज होणार ? सिद्धार्थ आनंदच्या हार्ड-कोअर एरियल एंटरटेनर फाइटरमध्ये हृतिक रोशन दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात हृतिक स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया उर्फ पॅटीच्या भूमिकेत दिसणार आहे.तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ मिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटात अनिल कपूर कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ रॉकीच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट फायटर पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८