कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई प्रतिनिधी पुनित खांडेकर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या मुलुंड येथील वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री साहेबांसमोर १ कोकणात होणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजला कै.शामराव पेजे साहेबांचे नाव देण्यात यावे ही मागणी करण्यात आली.२ खितपत राहिलेल्या  बेदखल कुळांचा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करणे.३ कुणबी आर्थिक विकास महामंडळाला मिळणारी रक्कम दुप्पट करणे.४ परेल येथील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ह्या मातृसंस्थेच्या इमारतीचा कायापालट करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठीचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते.

  या प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.त्याच प्रमाणे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार व त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.कुणबी विद्यार्थी वसतिगृह हे परिपूर्ण बांधकाम असून शासकीय निधी आणि सामाजिक निधीतून बांधण्यात आली आहे.सदर इमारत ही सहा मजली असून पहिल्या मजल्यावर व्यावसायिक गाळे वसतिगृहाचे कार्यालय आहे.दुसऱ्या मजल्यावर राहण्याची त्याचप्रमाणे जेवणासाठी भोजनालय आहे.तिसऱ्या मजल्यावर कार्यक्रमासाठी प्रशस्त असे ३०० लोकांच्या मर्यादेचे वातानुकूलित सभागृह आहे.चार-पाच आणि सहा मजल्यावर उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक अशा विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे.प्रत्येक खोलीत प्राथमिक स्वरूपात ३ बेड आणि एक कपाट अशी व आधुनिक प्रसाधन अशी व्यवस्था आहे.

  संपूर्ण इमारतीसाठी लिफ्टची सुविधा आहे.चाळीस वर्षांचे स्वप्न अथक परिश्रमानंतर आज सत्यात उतरले आणि ते शक्य झाले ते केवळ कुणबी बंधवांमुळे असे मत प्रत्येक कुणबी समाजाचा घटक व्यक्त करतांना दिसत होता.कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या मुलुंड येथील वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे खासदार मनोज कोटक बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालाम ओबीसी नेते अण्णा शेंडगे चंद्रकांत बावकर कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे संभाजी ब्रिगेड संगटनेचे नितीन बारस्कर संजीव येद्रे प्रतीक सकपाळ स्वराज्य प्रतिष्ठान रायगड चे संस्थापक भास्कर कारे प्रामुख्याने उपस्थित होते.त्याच प्रमाणे कुणबी समाजोन्नती संघाचे संघ अध्यक्ष भूषण बरे साहेब आणि समस्त शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते रायगड पालघर राजापूर रत्नागिरी ठाणे येथून बहुसंख्येने उपस्थित होते.मुलुंड येथील वसतिगृहात सकाळ पासून अनेक समाज बांधवांनी वास्तूचे दर्शन घेतले आणि साकारण्यात आलेल्या पूजेत सहभागी होऊन छत्रपती संभाजी महाराज मैदानावर कुणब्यांच्या पाखरांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.सदर कार्यक्रमाला प्रशासनाने खूप चांगले सहकार्य केले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८