राजकारणात आणि प्रेमात सर्व काही माफ असत ? पण त्यालाही मर्यादा आहेच ..

ल्याण प्रतिनिधी : आजपर्यंत कधीच  नव्हते ऐवढे घाणेरडे राजकारण सुरु आहे. राजकारणात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं असं जरी मानलं तरी त्यालाही मर्यादा आहेच की ! देशातील मतदार सर्वसामान्य नागरिक ऐवढी वैतागली आहे कि नको ते राजकारण आणि नको ते मतदान.? अशी स्थिती झाली आहे.दररोज बातम्यात राजकारणाचे अत्यंत विभत्स दर्शन घडत आहे.कमरेच्या खालीच नव्हे तर पार्श्वभागा पलीकडे गेलेली पातळी काय दर्शवते ! राजकारणाची ऐवढी अधोगती कधीच नव्हती.संस्कार संस्कृती विसरुन देश बदनाम होत आहे याचे भान नसणारे लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा करणार ? 

  खरंतर संपूर्ण हिंदुस्थानाची प्रभु राम हे अस्मिता आणि श्रध्दा आहेत. त्याबाबत राजकारण होत असेल तर असे घाणेरडे राजकारण करणा-या नेतृत्वाला जनतेने श्रीराम भक्तांनी जाब विचारायला पाहीजे ! कारण देशातील लोकशाहीत प्रत्येक धर्माचा आदर आणि स्वायत्त दिलेली आहे. आपल्या हिंदु धर्मात चार शंकराचार्याचे धर्मपीठ आहे.परंतु त्यांना ही विश्वासात घेतलेले दिसत नाहीत म्हणुनच हे पीठाधिश्वर कधी नव्हे ते आता संतप्त प्रतिक्रिया देत आहेत त्यांच्या परंपरागत अधिष्ठतेला आव्हान करुन पीठाधिश्वरांच्या धार्मिक हक्कावर कुरघोडी केली जात आहे. याचाच अर्थ हिंदुस्थानातील तमाम हिंदुच्या धार्मिक भावना व श्रध्देचे खच्चीकरण केले जात आहे.

  राजकारणाने धर्मपीठावर केलेली ही हुकुमशाहीच म्हणावी लागेल. असे या आगोदर पारतंत्र्यात देखील कधीच घडले नव्हते. प्रसिद्धीलोलुप राजकारण कि सत्तेच्या सिंहासनाचा अतिरेक आयोध्देतील रामजन्मभुमीवर श्रीराममुर्तीचे अधिष्ठापना हि हिंदु धर्मपीठाच्या शंकराचार्याच्या हस्ते हिंदु रितीरिवाजा नुसारच झाली पाहीजे अशी तमाम हिंदुची आणि श्रीराम भक्तांची इच्छा आहे. धर्मापिठांना दिलेले आधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.तसे झाले तर ती प्रातरणा ठरेल. "रा" रामप्रभुंचा न राहता राजकारणातील घाणेरडापणाचा ठरेल ! हिंदुत्व म्हणजे त्याग-श्रध्दा- समर्पन यांचा त्रिवेणी संगम आहे. त्याला तिलांजली देणे धर्म विरोधी हिंदुत्व विरोधी ठरेल ! अशा हिंदुत्वाचा समाचार जनता जनार्दन घेईल यात शंका नाही.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८