मुंबईत काल ज्या सेतूचे उद्घाटन झाले तिथे असा असे टोल...

मुंबई प्रतिनिधी : कार प्रवासासाठी एका वर्षाच्या पासची किंमत १.५ लाख रुपये आहे.आणि भारतात दरडोई सरासरी वार्षिक उत्पन्न  १ लाख  १३ हजार ३9५ रुपये आहे.१७८०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतू वरील टोल २००० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापेक्षा निम्मा

  १७८०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतूच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि तो वाहतुकीसाठी खुला झाला.या रस्त्यावर कारसाठी जाऊन येऊन टोल ३७५ रुपये आहे.मात्र २४ वर्षांपूर्वी २००० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या व आजवर दहा हजार कोटी रुपयांहून अधिक टोल वसुली झालेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजही कारसाठी जाऊन येऊन टोल ६४० रुपये आहे. आणि २०३० पर्यंत ही वसुली सुरूच राहणार आहे. आधुनिक काळातील हे आठवं आश्चर्य मानावं की या खुले आम चाललेल्या लुटीबद्दल संताप व्यक्त करावा.हे कोड उलगडत नाही.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८