स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासूनच करावी ! -रविंद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासूनच करावी यासाठी Result Oriented काम करावे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी आज केले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ आज सकाळी ९/आय प्रभागात संपन्न झाला त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.यासमयी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे परिमंडळ-३ चे उपायुक्त सचिन गुंजाळ तसेच माजी पदाधिकारी/नगरसेवक महापालिका अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.या समयी उपस्थितांमार्फत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

  स्वच्छता ही महापालिकेची सामुहीक जबाबदारी आहे प्रत्येक अधिकारी-कर्मचा-यांनी ही जबाबदारी समजून रस्त्यावर उतरुन प्रत्यक्ष काम करावे ही काळाची गरज आहे. कचरा पडण्याच्या ठिकाणी स्वच्छता दुत नेमावे माजी नगरसेवक एनजीओ यांना देखील आपल्या कामात सहभागी करुन घ्यावे असेही ते पुढे म्हणाले.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील हे स्वच्छता अभियान लोकांच्या मनात स्वच्छतेचे महत्व बिंबवित आहे.सर्वत्र ही मोहीम राबविणे गरजेचे आहे. डिव्हायडर स्वच्छ झाले पाहिजेत. रस्ता मॉडेल रस्ता कसा होईल याची दक्षता घेतली पाहिजे आणि रस्ते सार्वजनिक शौचालये या ठिकाणी दैनंदिन स्वच्छता असणे आवश्यक आहे.यासाठी आठवड्या अखेरीस तीन दिवस हा स्वच्छतेचा ड्राईव्ह घ्यावा असे उद्गार खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात काढले.सर्वांच्या मदतीनेच स्वच्छता मोहीमेस गती येईल असे उद्गार आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी बोलताना काढले.

  या स्वच्छता मोहीमेसाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मदतीतून सुमित फॅसिलीटीज लिमिटेड या संस्थेचे २०० सफाई कर्मचारी आणि प्रामुख्याने डिव्हायडरची स्वच्छता करणारे तसेच वॉटर स्प्रिंकलींग करणारे पॉवर स्विपर मशीन उपलब्ध झाले होते.आजच्या मोहीमेत ९/आय प्रभागातील सर्व रस्त्यांवर २ जेसीबी ४ एलआरसी वाहने ३ एसआरसी वाहने १० घंटा गाड्या १ जेटींग मशीन १ जीगफॉग मशीन ६ डंपर २ डस्ट मिटीगेशन वाहने २ पाण्याचे टँकर १ रोड स्विपर २ मल्टीजेट फवारणी युनीट त्याचप्रमाणे झाडु खराटे फावडे घमेली इ.साहित्याचा वापर करुन सर्वकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून या मोहीमेंतर्गत आता प्रत्येक शनिवारी महापालिका परिक्षेत्रातील इतर प्रभागांमध्येही सर्वकष स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी यावेळी दिली.ही मोहीम राबविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील व ९/आय प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर मुख्य-स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर दोन्ही उप-स्वच्छता अधिकारी स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८