प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन

बांद्रा-कुर्ला संकुल येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी प्रयोगशाळेचे

मुंबई प्रतिनिधी : अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत  बांद्रा-कुर्ला संकुल मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा समारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार पूनम महाजन आयुक्त (अन्न) अभिमन्यू काळे  यांच्या प्रमुख उपस्थितीत रांगणेकर सभागृह पहिला मजला अन्न व औषध प्रशासन  बांद्रा कुर्ला-संकुल बांद्रा (पूर्व) मुंबई येथे होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.

  अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली (FSSAI) यांच्या देशातील अन्न चाचणी प्रणालीचे बळकटीकरण यासह मोबाईल फूड टेस्टिंग लॅब या योजनेअंतर्गत राज्यात Microbiology प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.बांद्रा-कुर्ला कोम्प्लेक्स मुंबई येथे Microbiology प्रयोगशाळा उभारणीसाठी  एकूण ४५० लाख  निधी केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे. मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोग शाळेत अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. प्रयोगशाळेत अन्न नमुन्यांचे microbial विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून इथे उच्च कुशल तांत्रिक कर्मचारी (high-skilled worker) नियुक्त केले जाणार आहेत.

  प्रयोगशाळा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पाणी मसाले फळे आणि भाजीपाला उत्पादने आणि मांस आणि मांस उत्पादने  इ.अन्न पदार्थामधील सूक्ष्मजीव दूषित पदार्थचे विश्लेषण करण्यासाठी सुसज्ज करण्यात आली आहे.या प्रयोगशाळेत कमी कालावधीत जास्तीत जास्त नमुने विश्लेषण करणे शक्य होणार आहे.प्रयोगशाळा उद्घाटन समारंभास मान्यवर पदाधिकारी नागरिक आणि प्रसार माध्यमातील प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यु काळे यांनी केले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८