तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही.एम.कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडे शेखर मनोहर चन्ने डॉ.प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्त पदाची  शपथ दिली.

  आज मंत्रालयात  राज्य माहिती आयुक्त पदांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक राजगोपाल देवरा नितीन गद्रे माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहूल पांडे नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भुपेंद्र गुरव यांची उपस्थिती होती.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८