महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेत पदक विजेते खेळाडू..

पुणे प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यातील पुणे येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेत पार्मिता कांबले हिने ११-४० किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहेत.आदिती नायक हिने ९ वर्ष ३५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहेत.दक्ष लुल्ला याने १० वर्ष ४० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहेत.लकी नायडू याने १० वर्ष ४० किलो वजनी गटात जिंकले आहेत.कोश चौधरी याने ९ वर्ष ३५ किलो वजनी गटात कास्यपदक जिंकले आहेत.श्लोक लोकरे याने ७ वर्ष गटात कास्यपदक जिंकले आहेत आणि खितेश पराते याने यांनी अतिशय सुंदर प्रदर्शन केले त्याबद्दल त्याला अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.
    महाराष्ट्र राज्य कराटेचे अध्यक्ष सलाउद्दीन अंसारी आणि सचिव संदीप गडे यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.कल्याण मधील खेळाडूंचे प्रशिक्षक मार्शल आर्ट्स शोतोकान कराटे असोशियन येथे होत असून कल्याण मधील सेंसाई विवेक शुक्ला यांचे मार्गदर्शन लाभले आहेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८