या स्पर्धेत बोरीवलीच्या जुनी एम एच बी वसाहत येथील सुहास परब यांच्या स्पोर्ट्स मार्शल आर्ट अकॅडमीच्या ६ विध्यार्थ्यांनी भाग घेतला होता व या सर्व विद्यार्थ्यांनी हेवा वाटेल असे यश संपादन केले आहे.या ६ विध्यार्थ्याने एकूण १२ पदके मिळवली.
९ वर्षा खालील १) निलराज ताठे २ सुवर्ण पदक २) धैर्य खराडे १ सुवर्ण १ रौप्य ११ वर्षा खालील १) स्पृहा डोंगरीकर १ सुवर्ण १ रौप्य २) अर्णव रानडे १ सुवर्ण १ कास्य १४ वर्षा खालील जानव्ही परब १ सुवर्ण १ रौप्य १५ वर्षा खालील केदार वैद्य १ रौप्य १ कास्य
या यशस्वी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन्सचा जुनी एमएचबी येथील दत्त मंदिर येथे समाजसेवक संजय परब प्रसाद परब मंदार रानडे व पत्रकार-छायाचित्रकार अनुराग पवार यांच्या हस्ते पदक ट्रॉफी व प्रशास्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मनसे उपविभाग अध्याक्षा अपेक्षा पवार यांचही विशेष सहकार्य.जगभरातील प्रशिक्षक देखील उपस्थित होते आगामी २५ वी विश्वचषक स्पर्धा पोर्तुगाल येथे २०२५ मध्ये होणार आहे.
सुहास परब व यतीन डोंगरीकर यांच्या कुशल मार्गदर्शना खाली या ६ विद्याथ्यांनी घवघवीत यश मिळवल व भारतातर्फे खेळण्याची संधी मिळावी व त्याना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.