भगतसिंग कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन केला साजरा

भगतसिंग कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन केला साजरा


राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामुंबई प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.


            करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर  योग वर्गामध्ये उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर योग्य खबरदारी घेण्यात आली.


            सांताक्रूझ, मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या वतीने योगवर्गाचे आयोजन करण्यात आले.


     दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                    घरी राहा, सुरक्षित राहा 
                    प्रशासनाला सहकार्य करा...