रिसोडमधील कामासंदर्भात प्रस्ताव पाठवावेत

रिसोड तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत


-  अशोक चव्हाण



मुंबई प्रतिनिधी : रिसोडमधील रस्त्यांच्या दुरुस्ती कामासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात यावा. तसेच आवश्यक तो निधीची तरतूद करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रस्त्यांच्या विविध कामासंदर्भात झालेल्या बैठकीत आमदार अमित झनक, सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे उपस्थित होते.रिसोडमधील अनेक रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे गरजेचे आहे. त्यासाठी किमान 20 कोटी रुपये निधी द्यावा. हायब्रिड ॲन्युईटी प्रकल्पांअंतर्गत सुरु असलेल्या मालेगावमधील पालखी रस्ता आणि रिसोड-वाशिम रस्त्यांचे कामातील त्रुटी दुर करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशा मागण्या आमदार श्री. झनक यांनी केल्या.


      रिसोड मतदार संघातील रस्त्यांच्या कामासंदर्भात अमरावती विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणी दूर कराव्यात व दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत, असे निर्देश  चव्हाण यांनी यावेळी दिले.


   दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏