शवदहनाची सोय आता विनामुल्य..

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मुरबाड रोड, कल्याण (प), बैलबाजार, कल्याण (प), लालाचौकी आधारवाडी, कल्याण (प), विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व), शिव मंदिर, डोंबिवली (पूर्व), पाथर्ली, डोंबिवली (पूर्व )या 6 ठिकाणी गॅस शवदाहिन्यासह लाकडावरील बर्निंग स्टँडची व्यवस्था कोविड मृत्यूच्या शवदहनासाठी उपलब्ध आहे. सदर स्मशानभूमींवरील ताण कमी करण्यासाठी आणि दहन प्रक्रियेस होणारा विलंब टाळण्यासाठी टिटवाळा येथे काळू नदीच्या काठावरील स्मशानभूमीमध्ये, ठाकुर्ली पूर्व चोळे स्म्शानभूमीमध्ये, डोंबिवली पश्चिम येथील मोठागांव स्मशानभूमीमध्ये आणि कुंभारखाणपाडा स्मशानभूमी, येथे कोविड मृत्यूंसाठी लाकडावर विनामुल्य शवदहनाची सोय आता उपलब्ध करण्यात आली आहे. इतरही स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत पावलेल्यांसाठी  लाकडावर विनामुल्य शवदहनाची सोय‍ टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

         नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच शवदहन प्रकीयेत होणारा विलंब कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात मृत पावलेल्या शवांचे दहन नजिकच्या स्मशानभूमीत करण्याबाबत कोविड रुग्णालय प्रमुखांना व खाजगी कोविड रुग्णालय प्रमुखांना कळविण्यात आलेले आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८