गीर गाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार - पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार
गीर वळू पासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गीर प्रजातीचे पैदासीव्दारे शेतक-यांचे व पर्यायाने राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. डिसेंबर 2021 पुर्वी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कृतीबंध आराखडा तयार करुन वळूंची आयात करून प्रक्षेत्रवर करण्यात यावेत अशा सूचना केदार यांनी यावेळी दिल्या.या बैठकीत विदर्भातील नाविन्यपूर्ण व विशेष घटक शेळी गट वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. सानेन शेळी आयात करणेसंदर्भात एजन्सीकडून माहिती घेण्यात आली.नागपूर येथील मदर डेअरीमार्फत कार्यरत दूध प्रक्रिया व दूध भुकटी प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यात दूध भुकटी प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना केदार यांनी दिल्या.
या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे प्रतिनिधी गुप्ता, हातेकर, पशुसंवर्धन विभागाचे सह सचिव मानिक गुट्टे, उपायुक्त धनंजय परकाळे, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त तुंबाड, उपसचिव गोविल, अवर सचिव केंडे उपस्थित होते.